Koha home

ग्रंथालया संदर्भातील माहिती

श्री स्वामी समर्थ धार्मिक ग्रंथालय

                अध्यात्मिक जनजागृती, समाजप्रबोधन व स्वामीभक्तीचा प्रसार हा उद्देश ठेवून सद्गुरू श्री चैतन्यस्वरूप ती. अण्णा आणि सद्गुरू श्री लक्ष्मीस्वरूप ती. सौ. आईंनी २० ऑक्टोबर १९८८ रोजी विजयादशमीच्या मुहूर्तावर "श्री स्वामी समर्थ धार्मिक ग्रंथालयाचा" शुभारंभ केला. सद्गुरूंनी अध्यात्मिक ज्ञानाचे दालन सामान्य जनांसाठी खुले केले.

             डोंबिवली येतील हे ग्रंथालय महाराष्ट्र शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालय आहे. ग्रंथालयातील एकूण ग्रंथसंख्या ही १६४४० आहे . ग्रंथालयात इतर भाषांचीही काही पुस्तके आहेत. अत्यंत अल्प दरात हा खजिना डोंबिवलीतील वाचकांना उपलब्ध करून दिला जात आहे. हे ग्रंथालय रोख व पुस्तक स्वरूपातही देणगी स्वीकारते. ग्रंथालयातील सर्व पुस्तकांची माहिती कोहा या आज्ञावलीचा वापर करून अद्ययावत केलेली आहे.  तसेच ग्रंथालयातील दैनंदिन कामे ही कोहा या आज्ञावलीचा वापर करून केली जात आहेत. ग्रंथालयातील सर्व  पुस्तकांना बारकोड लावलेले आहेत. 

             ग्रंथालयातील एकूण  सभासद संख्या ही ५८५ असून  यामध्ये ८५  बाल वाचक आहेत. सर्व  सभासदांना पुस्तकांची देवघेव ही संगणकाचा वापर करून केली जात आहे. 

ह्या ग्रंथालयातील काही प्रमुख विभाग खालीलप्रमाणे

१) धार्मिक विभाग

    • सद्गुरू श्री चैतन्यस्वरूप व सद्गुरू श्री लक्ष्मीस्वरूप यांची आध्यात्मिक ग्रंथसंपदा
    • कोशवाङ्मय (इतिहासकोश, वाङ्मयकोश, चरित्रकोश, सांस्कृतिक कोश, सरिताकोश, विश्वकोश, शब्दकोश, दत्तात्रेयकोष, गणेशकोश इ.)
    • अध्यात्मिक संदर्भ दिवाळी अंक (१९८० पासूनचे)
    • तत्वज्ञान, वेद, उपनिषद, कात्रण संग्रह, दुर्मिळ पोथ्या, संस्कृत संहिता, ज्योतिषशास्त्र इ.
    • दत्तसंप्रदाय, वारकरी संप्रदाय, रामायण, महाभारत, भागवत,श्री रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद साहित्य, संत चरित्रे इ.
    • ग्रंथ व त्यांचे संदर्भ सखोल अभ्यासकांना उपलब्ध करून दिले जात आहेत. 

          मराठीचा अभ्यास करणारे अभ्यासक या ग्रंथाचा उपयोग करून घेत आहेत. त्यामुळे  ग्रंथलयातील ग्रंथांचे विशेष महत्व जाणवते. त्यामुळे, ह्या धार्मिक विभागातील ग्रंथांचा सखोल अभ्यासक, पीएचडी, एम लिब करणारे  विद्यार्थी, कीर्तन शिकणारे, कीर्तन करणारे,परीक्षा देणारे अशा सर्व प्रकारचे वाचक संदर्भासाठी लाभ घेतात. ग्रंथलयासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट म्हणजे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक च्या एका एम.लिब. विद्यार्थिनीने ह्या ग्रंथलयावर प्रबंध सादर केला आहे. "श्री स्वामी समर्थ धार्मिक ग्रंथालय -एक अभ्यास". 

२) ऐतिहासिक विभाग

३) महिला विभाग- कथा, कादंबरी, ललित लेख, कला, साहित्य इ. अवांतर वाचन

४) संगीत विभाग- भारतीय संगीत विषयक ग्रंथ, चरित्र, माहिती

५) वैद्यकीय विभाग - आयुर्वेद, निसर्गोपचार, रेकी, होमिओपॅथी,अॅक्युप्रेशर, अॅक्युपंक्चर इ.

६) बालविभाग- पुस्तक वाचनाबरोबर शालेय प्रोजेक्टसाठी बालवाचक ग्रंथालयाचा उपयोग करतात. 

ग्रंथालयाची यशस्वी वाटचाल-
  • १९९३ : महाराष्ट्र शासनाची मान्यता मिळाली ('ड' वर्ग)
  • १९९४-९५ : उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालयाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार
  • २००१ : ग्रंथालयास 'क' वर्ग मान्यता
  • २००७-०८ : ग्रंथालयास 'ब' वर्ग मान्यता
ग्रंथालयातील काही प्रमुख उपक्रम 

१) ग्रंथपाल-वाचक मेळावा

२) प्रदर्शने- दुर्मिळ ग्रंथ प्रदर्शन, मासिक ग्रंथ प्रदर्शन, प्रसंगानुरूप ग्रंथ प्रदर्शन व इतर प्रदर्शनामध्ये सहभाग (ठाणे ग्रंथ संग्रहालय)

३) वाचकांच्यासाठी व्याख्याने, काव्यवाचन कार्यक्रम, निबंध स्पर्धा, पुस्तक परीक्षण स्पर्धा, प्रश्नमंजुषा इ.

४) एस. आर. रंगनाथन जयंती कार्यक्रम- १२ ऑगस्ट

५) ग्रंथालय वर्धापन दिन

६) मराठी दिन उपक्रम व इतर वार्षिक समारंभ

७)  दरवर्षी शिवराजयभिषेक सोहळा साजरा केला जातो 

८)  महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार सर्व कार्यक्रम ग्रंथालया मार्फत साजरे केले जातात. 


ग्रंथालयाची वेळ :
सकाळ विभाग          :  ९.००   ते १२.०० 
संध्यायकाळ  विभाग  :  ५.००   ते ८.०० 
ग्रंथालय संपर्कासाठी पत्ता : 
श्री स्वामी समर्थ ग्रंथालय 
श्री गोविंदानंद श्रीराम मंदिर, पहिला मजला, प. पू. सदगुरू अण्णा लिमये चौक, स्टेशन रोड 
डोंबिवली (पूर्व)
Published on 06.07.2023

Login form

Log in to your account: